प्रत्येकाने आपल्या जीवनात एकातरी खेळामध्ये सहभाग घ्यावा – देवराव भोंगळे

0
343

प्रत्येकाने आपल्या जीवनात एकातरी खेळामध्ये सहभाग घ्यावा – देवराव भोंगळे


“माजी सभापती चषक 2023”
न्यू जगन्नाथ क्रीडा मंडळ कोंढा तालुका भद्रावती द्वारा आयोजित जिल्हास्तरीय पुरुषांचे भव्य कबड्डी सामने आयोजन करण्यात आले होते. सदर सामन्याचे उद्घाटन मा. श्री. देवराव दादा भोंगळे अध्यक्ष भाजपा चंद्रपूर तसेच माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले.

देवराव दादा या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले की प्रत्येकाने आपल्या जीवनात एका तरी खेळा मध्ये सहभाग घेतला पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये आपण आपले भविष्य तर उज्वल करू शकतो व आपले शरीर सुदृढ राहण्याकरता हे फलदायी ठरते, कबड्डी हा मातीतला खेळ आहे पण दिवसान दिवस या मातीचे रूपांतर मॅट मध्ये झाले आहे तरीसुद्धा या खेळाला तितकीच पसंती आताही खेळाडू मार्फत व प्रेक्षकांमार्फत मिळत आहे. या कबड्डी सामन्यात सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे व टीमचे मनःपूर्वक स्वागत करतो व त्यांना उज्वल भविष्य करता शुभकामना देतो असे उद्बोधन श्री. देवराव दादा यांनी व्यक्त केले.

सदर सामन्यामध्ये अध्यक्ष म्हणून माननीय श्री. करण भाऊ देवतळे प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा म.रा., प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. प्रवीण भाऊ ठेंगणे माजी सभापती पं. स. भद्रावती, मा. श्री यशवंत भाऊ वाघ माजी जि.प.सदस्य, मा. श्री. प्रवीण भाऊ सुर माजी जि. प. सदस्य, मा. श्री. नामदेव डाहुले महामंत्री भाजपा, मा. श्री. महेश भाऊ मोरे सरपंच ग्रामपंचायत कोंढा मा. श्री. मंगेश भाऊ मंगाम उपसरपंच ग्रामपंचायत कोंढा, मा.श्री. बतकी सर,शिक्षक, मा.श्री. भैय्या भाऊ नाकाडे माजी उपसरपंच मा. श्री. विरमलवार सर मुख्याध्यापक, मा. श्री. राजेश भाऊ मते अध्यक्ष तंटामुक्ती समिती, मा. श्री मारुती भाऊ मडावी भारतीय सैनिक, मा. श्री. प्रकाश भाऊ चिकटे माजी सैनिक, मा. श्री. सचिन भाऊ डुकरे अध्यक्ष तंटामुक्ती समिती,मा. श्री साधुजी मत्ते अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, मा. श्री. देविदास गोरे मंडळाचे मार्गदर्शक, मा. श्री. प्रतीक दर्वे मंडळाचे अध्यक्ष, मा.श्री. अक्षय नागापुरे सामाजिक कार्यकर्ता, मा. श्री. नितेश बानोत सामाजिक कार्यकर्ता यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच कोंढा गावातील असंख्य नागरिक महिला भगिनी व खेळाडूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here