शेगावला निघालेल्या वारीला गंगुबाई (अम्मा) जोरगेवार यांनी दाखवली हिरवी झेंडी…

145

शेगावला निघालेल्या वारीला गंगुबाई (अम्मा) जोरगेवार यांनी दाखवली हिरवी झेंडी…

श्री. गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने चंद्रपूर ते शेगाव अशी वारी काढण्यात आली आहे. दरम्यान आज या वारीला चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिर येथुन सुरुवात झाली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखवीली.

दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री. गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने शेगाव वारीचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून चंद्रपूरातुन या वारीला सुरवात झाली आहे. गजानन मंदिर येथुन सदर वारी माता महाकाली मंदिर येथे पोहचली. यावेळी येथे सदर वारीचे स्वागत करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांनी शुभेच्छा दिल्यात. माता महाकालीचे दर्शन घेऊन वारी शेगावच्या दिशेने निघाली. तत्पूर्वी सदर वारीला गंगुबाई जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखविली हि वारी चंद्रपूर, कळंब, माहुर, वाशिम होत शेगाव येथे पोहचणार आहे. या वारीत शेकडो वारकरींनी सहभाग घेतला आहे.

यावेळी माता महाकाली मंदिर ट्रस्टी सुनील महाकाले, श्री गजानन महाराज सेवा संस्थेचे गजानन देशमुख, बब्बू भुल्लर, बबन कृषपल्लीवार, श्रीकांत अंजिकर, राकेश खाडिलकर, भिवसन गौरकार, बंडुभाऊ रायपूरे, लोकचंद कापगते, जनार्दन उमे, बादल रायपुरे, मुरलीधर घुमे, प्रतिभा प्रमोद धुमने, कमलाताई अलोने, जगदीश वाघमारे, निकिता देशमुख, विजयालक्ष्मीबाई बंटूछाया सैनी आदिंची उपस्थिती होती.

advt