सुपरिचित कवयित्रि तथा शिक्षिका मालती सेमलेंच्या कविताचा किशाेर मासिकात समावेश !

0
554

 

चंद्रपूर- किरण घाटे विशेष प्रतनिधी :- चंद्रपूर गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील कवयित्रि तथा शिक्षिका मालती सेमले यांच्या बालकाव्य संग्रहातील बाग आम्हा मुलांची ” काळा काळा फळा “या

कवितेला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ व्दारा प्रकाशित हाेणां-या माहे जून २०२१च्या किशाेर अंकात स्थान मिळाले आहे .मालती सेमले यांना शिक्षण क्षेत्रा साेबतच साहित्य क्षेत्रात विशेष रुची व आवड असून त्यांचा एक बालकविता संग्रह या आधीच प्रकाशित झाला आहे .

त्यांच्या ब-याच काव्यरचना विदर्भातील वर्तमान पत्रात तथा मासिकात प्रकाशित झाल्या आहे .त्यांनी महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्यासपीठावरील काव्यकुंज या सदरात आपल्या काही कविता या पुर्विच प्रकाशित केल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here