तावरजा पट्ट्यात युरियासाठी शेतकऱ्यांची ससेहोलोपट ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत

0
466

औसा ग्रामीण तालुका प्रतिनिधी ✍🏻मारुती शिंदे 

              

 लातूर/औसा – औसा तालुक्यातील भादा परिसर हा ग्रीन ग्बेल्ट म्हणून ओळखला जाणारा परिसर असून यावर्षी तावरजा मध्यम प्रकल्पात बर्‍यापैकी पाणीसाठा झाल्याने गव तावरजाच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सध्या मृगनक्षत्र निघाले असून ऊस या नगदी पीकाला खताची मात्रा देण्याची वेळ आली आहे. मात्र ऊसाला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात नत्राची आवश्‍यकता आहे त्यातच युरिया चा तुटवडा शेतकरी वर्ग चिंतेत आहे .

गेल्या दोन वर्षापूर्वी तावरजा मध्यम प्रकल्प कोरडाठक पडला असता उसाचे हजारो हेक्टर क्षेत्र मोडीत निघाले होते.

गेल्या वर्षीच्या पावसाने व गाळ उपसा झाल्याने तावर्जा प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने ऊस लागवडीकडे या परिसरातील शेतकरी पूर्णपणे वडला गेला आणि मोठ्या प्रमाणात खर्च करून ऊस लागवड केली. मात्र सध्या बाजारात युरिया या खताची कमतरता असल्याने ऊसाला नत्राची कमतरता भासणार हे निश्चित त्यामुळे युरिया साठी शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.

या परिसरातील शेतकरी खरीप हंगामाचे शेतातील पूर्ण कामे पूर्ण करून पेरणीसाठी सज्ज झाला आहे मात्र त्यातही महाबीज 335 ची बियाणे मिळत नसल्याने व इतर बियाण्यांचे भाव गगनाला भिडल्यामुळे कोरडवाहू शेतकरी चिंतेत असल्याचे चिन्ह या परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे त्यामुळे लवकरात लवकर बियाणे व खतांचा तुटवडा प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here