मॅजिक बस इंडिया फौंडेशनच्या वतीने पोंभूर्णा तालुक्यात माझी शाळा -माझी सुरक्षा उपक्रम
चंद्रपूर:- मॅझिक बस इंडिया फौंडेशन संस्था चंद्रपूरचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांचे मार्गदर्शनात व नियंत्रणात पोंभूर्णा तालुक्यातील गावागावात वर्ग ६ वी ते वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून जीवन कौशल्य वाढविणे उपक्रम चालू झालेला असून . बालक दिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत माझी शाळा माझी सुरक्षा उपक्रम घेण्यात येत आहे. सध्या कोरोना कोविड मुळे शाळा बंद आहेत जर अशा परीस्थितीत शाळा चालू झाल्यास शाळा व बालकांची सुरक्षितता यासंदर्भात तालुक्यातील प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांकडून त्यांचे मत निबंधाच्या माध्यमातून,चित्राच्या माध्यमातून जाणून घेतल्या जात आहे . तसेच पालकांचे,गावातील सरपंच,शिक्षक ह्यांचे सुध्दा मत जाणून घेतल्या जात आहे . हे उपक्रम घेत असताना शासनाने दिलेल्या निर्देशाचे योग्य पालन करून उपक्रम पार पाडले जात आहे.
माझी शाळा माझी सुरक्षा उपक्रम तालुक्यात शाळा सहाय्यक अधिकारी बजरंग वक्टे, सपना देऊरकर, तालुका समन्वयक हिराचंद रोहणकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री प्रशांत लोखंडे ह्यांच्या पुढाकारातून घेतल्या जात आहे.
