शेंद येथील तरूणाचा अभिनव उपक्रम  विवाहासाठी मोफत संसारोपयोगी साहित्य 

0
443

प्रतिनिधी/बाबूराव बोरोळे

लातूर :- कोरोना च्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या हलाखीची परिस्थितीत असलेल्या गरीब कुटुंबाला मुलीच्या विवाहाला हातभार लागावा म्हणून तालुक्यातील शेंद येथील देवा माने , गोविंद शेळके , लिंबराज माने , यासह सहा तरुणाने अभिनव उपक्रम राबवित 10 हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य भेट दिली आहे . सामाजिक बांधिलकीतून या सहा जणांनी केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे . कोरोना च्या काळात माणुसकी जपणारे अनेक हात मदतीला समोर येत आहेत . लॉकडाऊन मुळे शेंद येथील कांबळे यांच्या मुलींच्या विवाहासाठी या युवकाने स्वखर्चाने 10 हजारांचे संसारोपयोगी साहित्य दिलं असून त्यांचे हे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे . गेल्या वर्षभरापासून कोरोना च्या संकटामुळे संसर्ग रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदी केली असून निर्बंध लागू केले आहेत . त्यामुळे हाताला काम नसल्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत . जिथे खायचे वांदे तिथे उपवर झालेल्या मुलीचे लग्न कसे अशी चिंता वधू पित्याला सतावीत असताना अशात युवकांतून लग्नासाठी केलेली मदत वधू पित्याला दिलासादायक ठरले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here