प्रत्येक जिल्ह्यात पाेलिस बांधवासाठी काेविड हेल्थ सेंटर सुरु करावे -पोलीस बॉईज असाेशिएशनची मागणी !

0
457

प्रत्येक जिल्ह्यात पाेलिस बांधवासाठी काेविड हेल्थ सेंटर सुरु करावे -पोलीस बॉईज असाेशिएशनची मागणी ! पाेलिस महासंचालकांना केले निवेदन सादर !

चंद्रपूर, किरण घाटे : पोलिस कल्याण निधीचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात पोलीस बांधवांसाठी कोविड हेल्थ सेंटर सुरू करावे या मागणीचे निवेदन आज बुधवार दि. २८एफ्रिलला पाेलिस बाँईज असाेशिएशनचे संस्थापक -अध्यक्ष प्रमाेद वाघमारे यांचे सुचनेच्या अनुषंगाने या असाेशिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे , सद्दाम अंसारी , देविदास बाेबडे , शहराध्यक्ष साहिल मडावी , जिल्हा उपाध्यक्ष रिता शिंदे यांनी चंद्रपूर पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्फतीने पोलिस महासंचालक संजय पांडे यांना पाठविले .सदरहु निवेदन सादर करतांना उपरोक्त असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे चंद्रपूर जिल्हा संघटक – सद्दाम अन्सारी ,देविदास बोबडे – शहराध्यक्ष साहिल मडावी, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा रिता शिंदे यांची उपस्थिती हाेती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here