ग्रामीण रुग्णालयात १० तर उपजिल्हा रुग्णालयात किमान २० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर तात्काळ सुरू करा

0
574

ग्रामीण रुग्णालयात १० तर उपजिल्हा रुग्णालयात किमान २० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर तात्काळ सुरू करा

राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री ना. राजेशजी टोपे, जिल्हयाचे पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली मागणी

चामोर्शी, सूखसागर झाडे : गडचिरोली जिल्ह्यात सध्या स्थितीत कोविड १९ ने थैमान मांडले असून जिल्ह्यात ऑक्सीजन बेडची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे.त्यातच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकमेव असणाऱ्या जिल्हा रुग्णायावर त्याचा भार पडत असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे तातडीने ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडयुक्त कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.

ग्रामीण रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरला ऑक्सीजन युक्त बेडची उपलब्धता करून दिल्यास त्या त्या भागातील रुग्णांना त्या ठिकाणी वेळेवर ऑक्सिजन मिळून त्यांचा जीव वाचवण्यासाठी मदत मिळेल. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात किमान १० तर उपजिल्हा रुग्णालयात किमान २० ऑक्सिजन युक्त बेडच्या कोविड सेंटर तात्काळ सुरू करावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे,आरोग्यमंत्री जिल्हयाचे पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here