चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाकडे ना. विजय वडेट्टीवार यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

0
360

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाकडे ना. विजय वडेट्टीवार यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

रस्त्याची कामे उत्तम दर्जाची व्हावी : ना. विजय वडेट्टीवार

चौकशी करून कामे दिलेल्या अवधीत पूर्ण करा : ना.अशोकराव चव्हाण

राजु झाडे प्रतिनिधी

चंद्रपूर दि. 7 ऑक्टोबर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हायब्रीट अँन्यूटी अंतर्गत 1600 कोटीची कामे विविध कंत्राटदाराकडून सुरू आहेत. सर्व कामे कंत्राटदाराने घेताना शासन बांधकाम विभाग नियमानुसार 60 टक्के आणि कंत्राटदार 40 टक्के असा नियम वापरून संबंधित कंत्राटदार यांना परवानगी देण्यात आलेली होती.तरी,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकाही कंत्राटदाराने 40 टक्के निधीची उभारणी बँकेकडून कर्ज दाखवून केलेली नसून कंत्राटदाराने देखील स्वत:कडून निधीची उभारणी करून कामे पूर्ण केलेली नाहीत. तरी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अपूर्ण रस्त्यांच्या कामासंबंधीची बाब आपत्ती व मदत पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देत ही कामे तातडीने पूर्ण करण्यासंबंधीचे निर्देश दिले.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हायब्रीट अँन्यूटी अंतर्गत रस्त्यांच्या कामासंदर्भात आढावा बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली त्यावेळी श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्य अभियंता श्री. दशपुते, चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता साखरवाडे, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची कामे संथगतीने सुरु असून रस्त्यांची दुरावस्था आहे. कंत्राटदार 40 टक्के निधी खर्च करत नसून ही कामे शासनाच्या 60 टक्के निधीतूनच होत असल्याने कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.तरी या रस्त्यांची कामे उत्तम दर्जाचे दिलेल्या कालावधीत तातडीने पूर्ण व्हावे असे निर्देश ना. विजय वडेट्टीवार यांनी या बैठकी दरम्यान दिले. या बाबत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले असून तातडीने कामे पूर्ण होतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here