महावितरण कामगारांच्या एकजुटीने शासन घाबरले….. ऊर्जा मंत्री यांच्या स्तरावर बैठकीचे आयोजन

0
498

महावितरण कामगारांच्या एकजुटीने शासन घाबरले….. ऊर्जा मंत्री यांच्या स्तरावर बैठकीचे आयोजन

4,5,6 जानेवारी 2023 ला विज कर्मचारी संपावर

सर्व विद्युत ग्राहकांना विनंती त्यांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात दळण दळून घ्यावेत व तसेच विज चालणार्या उपकरणावर वरील कोणतेही कामे अगोदरच करुन घ्यावेत कारण उद्यापासून विद्युत विभागातील कर्मचारी संपावर आहेत.

“संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला हा विरोध आहे. नक्कीच हे तीन दिवस त्रासदायक होतील किंवा जाणार. पण आम्ही दिलगीर आहोत. हा संप फक्त ग्राहकांकरिता आहे. उदा BSNL बुडण्यापूर्वी जिओ फुकटात आजीवन सिम, जास्त स्पीड चा भरपूर डेटा पॅक देत होतं, आज कमी स्पीड चा डेटा पॅक ला 700 रुपये मोजावे लागतात. उद्या मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर वाढतील ते सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत. त्यांचे विरोधातील हा संप आहे.
काही ग्राहक सेवेमुळे दुखावलेले असतील, वसुल्यामुळे नाराज असतील पण ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारा सार्वजनिक विज उद्योग टिकला पाहिजे तो कोणताही का असेना… वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे. ती उद्या खाजगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार याकरिता हा संप आहे. लिहायला भरपुर आहे परंतु थोडक्यात समजविण्याचा छोटासा प्रयत्न केला आपण समजदार आहात यातील गौडबंगाल समजून घ्याल अशी अपेक्षा…” अशी अपेक्षा वीज कर्मचारी वर्गाकडून संपनिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here