नालीचा उतार व्यवस्थित करून अंडरग्राऊंड करा – उषाताई आगदारी
घुग्घुस येथील प्रभाग क्रमांक १० येथील परिसरातील नागरिकांचा घरासमोरील नालीच्या उतार बरोबर नसल्याने पाणी वाहुन जात नसल्याने नागरिकाच्या घरा समोर सांडपाणी साचत असल्याने स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यंग चांदा ब्रिगेड व बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उषाताई गौतम आगदारी यांनी लवकरात लवकर योग्य व्यवस्थित नाली बनवा नाहीतर अंडरग्राऊंड करा अशी मागणी केली असून सदर मागणीचे निवेदन घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्यधिकारी यांना दिले.
यावेळी नर्मदा खोब्रागडे, शिला सोंडूले, शांता पाटील, कामिनी देशकर तसेच परिसरातील महिला उपस्थित होत्या.