आगामी येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आम आदमी पार्टी बल्लारपूरच्या कॉर्नर बैठका सुरू

0
396

आगामी येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आम आदमी पार्टी बल्लारपूरच्या कॉर्नर बैठका सुरू

 

 

बल्लारपूर, २३ सप्टें. : आम आदमी पार्टी बल्लारपूर शहरातील जनजागृतीसाठी, मतांचे महत्त्व व जनतेच्या मुलभुत समस्या जाणुन घेण्यासाठी तसेच आम आदमी पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काल २२ तारखेला शहराध्यक्ष रविकुमार शं. पुप्पलवार यांच्या नेतृत्वात शिवनगर वार्ड बल्लारपूर येथून कॉर्नर बैठका सुरू करण्यात आल्या, या प्रसंगी परिसरातील शेकडो लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि सहकार्य केले आणि आम आदमी पक्षात सामील झाले, त्या परिसरातील लोकांनी भविष्यात तन-मन-धन लाऊन AAP बल्लारपूर साठी काम करणार अशा विश्वास दिला, या शुभ प्रसंगी, बालाजी वॉर्ड शांतीनगरच्या मुलांनी नृत्य केले आणि मनोरंजनाद्वारे लोकांना “आप” च्या विचारधारेची जाणीव करून दिली.

 

 

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे, जिल्हा विधि सलाहगार अॅड. किशोर पुसलवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, शहराध्यक्ष रविकुमार शं. पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली आणि राकेश वडसकर, सचिव एड. पवन वैरागडे, शहर संघटन मंत्री नीलेश जाधव, महिला शहराध्यक्षा अलकाताई वेले, उपाध्यक्ष शिलाताई शिवणकर, सचिव ज्योतीताई बाबरे, सह सचिव शीतलताई झाडे, संघटन मंत्री किरणताई खन्ना, सुदाकर गेडाम, अवदेश तिवारी, समशेरसिंह चौहान, सरिता गुजर, कृष्णा मिश्रा, सुमित ताकसांडे, प्रशांत गडाला, मीना केशकर, आदर्श नारायणदास, आशिष फुलझाळे, सलमा सिद्दीकी, जमीला अली, उमेश काकडे, उमेश कडू, प्रणय मेश्राम, दुर्गा शेंडे, सोनम लाहोर, स्नेहा गौर, नूरसबा सिद्दीकी, आशिष गेडाम इत्यादि उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here