विमा अभिकर्त्यांचे असहकार आंदोलन

0
361

विमा अभिकर्त्यांचे असहकार आंदोलन

 

बल्लारपूर/प्रतिनिधी, प्रा. महेंद्र बेताल
दि. 5 सप्टें. : भारतीय जीवन विमा अभिकर्त्यांचे दि. 1 सप्टेंबर 2022 पासून पॉलिसीधारकांच्या विविध मागण्यांसाठी देशभर आंदोलन सुरू आहे.

या पाच दिवसांत एल.आय.सी.ला कुठलेच इंकम् झालेले नाही. विमा कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विमा पॉलिसी वरील जी .एस.टी. कर रद्द करावा, पॉलिसी धारकांना मिळणारा बोनस दर वाढविण्यात यावा. लोनवरील व्यजदर कमी करण्यात यावा, विमा अभिकर्त्यांची ग्र्याज्युईटी मधे वाढ करावी. विमा अभिकर्त्यांसाठी भविष्य निर्वाह निधी योजना सुरू करावी. अशा अनेक मागण्या घेऊन विमा अभिकर्ते आंदोलन करीत आहेत.

मागील पाच दिवसांत कुठलाही व्यवसाय एल.आय.सी. ला झाला नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा ईशारा विमा अभिकर्त्यांनी दिला आहे.

यावेळी शैलेश वैद्य, प्रशांत घोडे, मनोज मुलकुलवार, मनोज दरेकर, मोरेश्वर दुर्गे, डी.बी.बोंडे, अनिल बोबडे, जयंत वांढरे, प्रविण धोपटे, प्रविण खेडेकर, प्रकाश धरत, प्रशांत सोनटक्के, मनोज बेले, प्रकाश झाडे, कमलेश नेवारे आदी उपस्थित होते.

1 सप्टेंबर पासून सुरू असलेले आंदोलन 5 सप्टेंबर नंतर तीव्र करणार आहोत. तसेच आंदोलनात जास्तीत जास्त विमा अभिकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष रामकृष्ण गव्हारे, सचिव नरेश भुरसे ,कोषाध्यक्ष प्रशांत सोनटक्के व इतर पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here