वाघाच्या हल्यात महिला ठार
पोंभूर्णा वनपरीक्षेत्रातील घटना
पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कविटबोळी शेतशिवारात आज दुपारी २:०० वाजताच्या सुमारास कसरगठ्ठा येथील महिला नामे बेबिबाई हनुमान धोडरे वय ५५वर्ष हि कापूस वेचन्याकरीता स्वत:च्या शेतात गेली असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सदर महिलेवर हल्ला चढवून महिलेला ठार केले घटनेची माहिती वनअधिकार्यांना मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा सुरू आहे..सदर महिलेच्या पश्चात पती,मुलगा,सून नातवंड असून धोडरे परीवारावर दुखःचे डोंगर कोसळले आहे वाघाच्या हल्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून नागरीकामध्ये भीतीचे वातावरन पसरले असून नरभक्षी वाघाचे बंदोबस्त त्वरीत करावे अशी मागणी गावकर्यांन कडून होत आहे
सविस्तर बातमी थोळ्याच वेळात