केवळ 15 हजारासाठी झाला महिलेचा खून, लोहारा येथील घटना
यवतमाळ, मनोज नवले
यवतमाळ येथील घटना 23 ऑक्टोंबरच्या ४.३० वाजता लोहाऱ्याच्या इंदिरा नगर वार्ड क्र. ५ वाघापूर रोड येथे सविता नरेंद्र जाधव (३८) या महिलेचा खून करण्यात आला होता. आरोपी पवन जयवंत चेके (२६) रा. इचोरी या तरुणाने केवळ १५ हजारासाठी हत्त्या केली. मृतक सविताने पवनला १५ हजार रुपये उसने दिले होते. काल तिने ते पैसे परत मागितले असता तिचा व पवनचा वाद झाला. आणि या वादात पवन ने तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकुने तिच्या गळ्यावर सपासप वार करुन ठार मारले.
तिच्या मदतीला मुलगा दिनेश नरेंद्र जाधव (१८) हा धावला असता तिच्या मुलाच्या डाव्या बोटावर चाकु मारुन त्यालाही जखमी केले व हे सर्व झाल्यानंतर आरोपी पवन हा घरातून पळून गेला. रात्रीच दिनेश ने लोहारा पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध कलम ३०२, ३२४, भादवि नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अवघ्या २ तासात अटक करण्यात आली.