पैनगंगा खदान मधुन कोळसा भरलेल्या ट्रक चा अपघात…..

0
477

पैनगंगा खदान मधुन कोळसा भरलेल्या ट्रक चा अपघात…..

 

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले
लालगुडा हायवेवर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात टळला. आत्ताच प्राप्त झालेल्या माहिती नुसार रात्री 8 वाजेच्या दरम्यान पैनगंगा खदान मधुन कोळसा भरलेला टी. कंपनीचा मालवाहू 12 चक्का MH 40 N 2549 या क्रमांकाचा 24 ते 25 टन कोळसा भरलेला ट्रक शिरपूर कडून वणीला येत असतांना ट्रक चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने जन्नत हाँटेल पासुन 200 मिटर च्या अंतरावर मोठा अपघात झाला.

 

 

 

चालकाच्या ट्रक ची गती अतिशय वेगाने असल्याने हायवे रोडवरून ट्रक हा खाली उतरला आणी इलेक्ट्रॉनिक पोल ला घासत गेला. तरी या अपघातात कुणीही जखमी झाल्यांचे वृत्त आले नाही. सदर टी. कंपनीच्या ज्या ट्रक चा अपघात झाला. तो ट्रक तुंन्नू सेठ भाई चा असल्याचे वृत्त हाती आले. सदर अपघात झालेल्या ट्रक मधील कोळसा हा तात्काळ 8 ते 10 मजूर लाऊन सदर MH 44 AB 5577 ह्या नंबरचे ट्रक मध्ये भरून कोळसा रात्रीला 11 च्या दरम्यान रवाना करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here