लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त गुणवंत विजेत्यांचा सत्कारसोहळा.
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका कोरपना द्वारा आयोजित राष्ट्पिता ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा गुणवंत सत्कार सोहळा “लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आला.”
या सोहळ्याचे अध्यक्ष अरुणजी निमजे विधानसभा अध्यक्ष राजुरा, प्रमुख उपस्थिती आबिद अलीजी, शरद जोगी ता. अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष न.प गडचांदूर, सौ. अश्विनीताई कांबडे नगरसेविका न.प गडचांदूर, प्रविण काकडे जिल्हासचिव, सुनिल अरकीलवार जिल्हाउपाध्य, आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धकांना प्रथम पारितोषिक शरदभाऊ जोगी, द्वितीय पारितोषिक सौ. अश्विनी कांबडे, तृतीय पारितोषिक अरुनजी निमजे, चतुर्थ मिनाक्षीताई एकरे यांच्या तर्फे देण्यात आले. स्मृतीशेस सुरेशराव जोगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शरद जोगी यांच्या तर्फे सन्मानचिन्ह तथा प्रमाणपत्र देण्यात आली.
गट क्रमांक १ शेतकऱ्यांचा आसूड आणि आजचा शेतकरी, या विषयातील प्रथम क्रमांक सिद्धार्थ चव्हाण, द्वितीय क्रमांक अनिकेत दुर्गे, तृतीय क्रमांक प्रलय म्हाशाखेत्री, चतुर्थ क्रमांक प्रतिक्षा वासानिक, गट क्रमांक २ ओबीसी जातनिहाय जनगणना काळाची गरज या विषयातील प्रथम क्रमांक आकाश कडुकर, द्वितीय क्रमांक अंकुश गोहणे, तृतीय क्रमांक धनराज दुर्योधन, चतुर्थ क्रमांक अविनाश रामटेके या विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र+पुष्पगुच्छ+रोख, या स्वरूपात गुणवंताचा सत्कार अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला शशिकांत चन्ने, करण सिंग भुराणी, प्रविण मेश्राम, आकाश वराटे, सदू गिरी, वैभव गोरे, मयुर एकरे, महावीर खटोड, रोहन कुळसंगे .सतीश भोजेकर.मुनीर शेख.सुरज कणाके .प्रफुल मेश्राम.आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.