आ.डाॅ.तूषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली तालुका मुखेड मध्ये चक्काजाम आंदोलन..

0
536

आ.डाॅ.तूषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली तालुका मुखेड मध्ये चक्काजाम आंदोलन..…………………….

चंद्रकांत राजूरकर

नांदेड जिल्हा

प्रतिनिधी

मो.8600420232

 

नांदेड/मुखेड

 

भारतीय जनता पक्षाचे मुखेड तालुक्यातील लाडके आमदार डॉ.तूषार राठोड यांच्या नेतृत्वाखालील आज दिनांक, सी 26/06/2021रोजी मुखेडच्या मुख्य रस्त्यावर आंदोलन करण्यात आले आहेत यावेळी डॉ उच्चेकराचे मार्गदर्शपर भाषणं केली आहे.व नंतर देविदास राठोड, यांची पण भाषन करण्यात आली आहे

१.५ वर्षापूर्वी राज्यात सत्तेसाठी १ अनैसर्गिक प्रयोग झाला जो आज राज्याच्या मुळावर उठला आहे. केवळ आणि सत्ता लोभापायी एकत्र आलेल्या आघाडी सरकारने सामाजिक विषयांचं पोतेरे केलं आहे. मा उच्च न्यायालयात टिकवलेलं मराठा आरक्षण आघाडी सरकारमुळं सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं. ओबीसी आरक्षणाचा विषय तर अजून सोपा होता पण आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणही रद्द झाले आहे. या सरकारकडून झालेल्या चूका नाहीत तर आघाडी सरकारने मराठा आरक्षण व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा नियोजितपणे, थंड डोक्याने खून केला आहे. आज मुखेड आणि बिलोली येथे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मी मुखेड येथील चक्का जाम आंदोलनात सहभागी होऊन सामाजिक विषयांचे गांभीर्य नसलेल्या आघाडी सरकारचा तीव्र निषेध केला.

ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्याचे अधिकार ज्यांच्या हातात आहेत तेच मंत्री आंदोलनाचे ढोंग करत आहेत. आधी आरक्षण घालवलं आणि आता आंदोलनाचं ढोंग करून ओबीसी समाजाची क्रुर चेष्टा करू पाहत आहेत. असे आमदार यांनी व्यक्त केले आहे या आंदोलनाला खालील मान्यवरांचे सहभाग घेतला होता विलास पाटील राजूरकर, माधव राठोड, अंशख्य समूह उपस्थित होता

 

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here