अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत चंद्रपूरात रक्तदात्यांचा सन्मान !

0
418

अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत चंद्रपूरात रक्तदात्यांचा सन्मान !

 विशेष प्रतिनिधी ✍🏻किरण घाटे :-

चंद्रपूर :10 मे रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर , धर्मवीर संभाजी महाराज आणि बहुजन हृदयसम्राट एड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त व तीनही महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त विसापूर येथे भीमशक्ती युवा ग्रुप व वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजित केलेली होती. त्या शिबिरात येथील तरुण युवकांनी रक्तदान केले हाेते. त्या निमित्त काल दि.18 जून रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह,चंद्रपूर येथे जागतिक रक्तदाता दिना निमित्त रक्तदान करणाऱ्या संस्थांच्या व रक्तदात्यांच्या राज्य संक्रमण परिषद व रक्तपेढी केंद्र, रक्तकेंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या वतीने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, शासकीय रुग्णालयाचे सीएस यांच्या हस्ते सन्मानचिन्हे,सन्मानपत्रे व एक वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले .या वेळी सन्मानपत्र स्विकारताना सिद्धांत पुणेकर, प्रथम दुपारे, गुंजन वानखेडे, फारुक शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here