निसर्ग मित्र मंडळाकडून जल व वृक्ष पूजन करून पर्यावरण दिन साजरा

0
443

निसर्ग मित्र मंडळाकडून जल व वृक्ष पूजन करून पर्यावरण दिन साजरा

वणी (यवतमाळ)/प्रतिनिधी : आपण आज सगळा मानवसमाज पर्यावरणीय समस्यानी ग्रस्त आहो. प्रदूषण नियंत्रण करणे हे एक पूर्ण पृथ्वीवर राहणाऱ्या मानवासाठी एक फार मोठे आव्हान आहे. ध्वनी, जल, हवा, जमिनीचे प्रदूषण हे याचे विविध कप्पे आहेत. पाणी- जमीन-वृक्ष-हवा असा पर्यावरण संतुलनाचा आधार आहे . ह्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला भविष्यात निसर्ग मित्र बनून आपल्या भोवताली असलेल्या पर्यावरण समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे हे काळाजी गरज आहे आणि आपण आता स्वतःला नाही बदलले आणि स्वतःची जबाबदारी ओळखून समस्या नाही सोडविली तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही

आज निसर्ग मित्र मंडळ वणीच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्थानिक निर्गुडा नदीच्या वामनघाटावर जल, वृक्ष (पिंपळ) जमिनीचे (वसुंधरेचे) पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक कुंतलेश्वर तुरविले,संघटक लोकसेवक अमित उपाध्ये, सागर झेप संस्थेचे अध्यक्ष कासार सागर मुने, मंडळाचे सदस्य युवा नेते विकेश पानघाटे, युवा सामाजिक कार्यकर्ते चैतन्य तुरविले हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here