!!पर्यावरण!! 

0
434

!!पर्यावरण!! 

सिंकदराबाद -किरण घाटे विशेष प्रतिनिधी -महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिका तथा मुळच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवाशी वयाेव्रूध्द लेखिका विजया पिटके- तत्वादी यांनी आज पर्यावरण दिना निमित्त एक संक्षिप्त लेख शब्दांकित केला ताे खास आम्ही वाचकांसाठी देत आहाे .

पर्यावरण म्हणजे आसपासच्या वातावरणात वापरण्यांत येणारी संज्ञा म्हणजे ज्यात जीव सजीव असतात. हवा ,पाणी अन्न व सूर्यप्रकाश यात आहे. सर्व जीवसृष्टीचे काम करण्यास सर्व प्राणी व वनस्पतीच्या गरजां‌ यावर आधारित आहेत पर्यावरणात जीवंत‌ प्राणी येतो.

हवा पाऊस तापमान हे सध्या शाळेत थाेड्या प्रमाणात शिकवतात.‌मानवाचे जीवन धोक्या पासुन मुक्त व्हावे तसेच जल प्रदुषण ,ध्वनी प्रदुषण परमाणु प्रदुषणाने असमतोल व उष्णता किरणोत्सव यांचे परीणाम आज दिसत आहेत जगातील प्रयोगाने कोरोना सारखे महाभयंकर रोग दिसतात.

वातावरण शुद्ध राहण्यासाठी पर्यावरणास मदत आपण करावयास हवी कारखान्यांमुळे हवा दुषीत होते.पण निसर्गाच्या ‌ सानिध्यात अन्न कपडे हवा प्राणवायू आपणास मिळतो त्यासाठी झाडे

जंगले वाचवा ही योजना अंमलात आणली पाहिजे. झाडांमुळे प्राणवायू मिळतो करिता पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक आहे.म्हणुनच म्हटले आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी !

पर्यावरण राखा व आपले जीवन सुरक्षित करा.

विजया पिटके तत्वादी

सिकंदराबाद(हैदराबाद )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here