भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून घुग्घुस येथे वेकोलि, एसीसी, लॉयड्स मेटल्स, नपच्या वतीने पाणीपुरवठा सुरु…

0
387

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून घुग्घुस येथे वेकोलि, एसीसी, लॉयड्स मेटल्स, नपच्या वतीने पाणीपुरवठा सुरु…

घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने या शहराची लोकसंख्या ५० हजारांचा जवळपास आहे. एकूण ११ प्रभाग असून सध्या उन्हाळा सुरु असल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.

त्या अनुषंगाने ही समस्या लक्षात घेत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलि व्यवस्थापन, एसीसी कंपनी व्यवस्थापन, लॉयड्स मेटल्स कंपनी व्यवस्थापन व न. प. प्रशासनाशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पिण्याच्या पाण्याचे टँकर घुग्घुस वासियांसाठी उपलब्ध करून दिले.

हे पाण्याचे टँकर घुग्घुस परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देत आहे.

मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे अमृत योजनेंतर्गत लवकरच पाणी पुरवठा योजना घुग्घूस शहराकरिता सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री साहेबांची मंजुरी मिळाली आहे. वेकोली सुद्धा घुग्घुस येथे दोन नवीन पाण्याच्या नवीन टाक्या बांधणार आहेत.

वेकोलि, एसीसी, लॉयड्स व नपच्या वतीने पाणी पुरवठा सुरु केल्याबद्दल शहर वासियांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here