ख-या आदिवासींच्या हक्कांचे संविधानिक संरक्षण व्हावे

0
727

ख-या आदिवासींच्या हक्कांचे संविधानिक संरक्षण व्हावे
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आदिवासी आरक्षण बचाव समितीची मागणी !

चंद्रपूर –🟡🟥🛑किरण घाटे🟣🟢
गेल्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर खरे आदिवासी आपल्या न्याय मागण्यां संदर्भात लढा देत आहेत.जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाने ख-या आदिवासींच्या बाजूने निर्णय दिला असतांना सुध्दा महाराष्ट्र् शासन त्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नाही. उलट गैर आदिवासी असलेल्या कर्मचा-यांना सेवा संरक्षण देत आहे म्हणून जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन (त्यांनी) आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आज सोमवार दि.१४ डिसेंबर २०२० ला दुपारी ४वाजता महाराष्ट्राचे मख्यमंत्री, .उपमुख्यमंत्री ,तसेच आदिवासी विकास मंत्री यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे मार्फत एक लेखी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
🟣🟢 🟡🟦☀️बोगस आदिवासी शासकिय व निमशासकिय कार्यालयात कर्मचारी म्हणुन आदिवासी आरक्षणाचा लाभ घेत आहे 🌼🔵🟥🟣त्यामुळे ख-या आदिवासीचा विकास खुंटलेला आहे .त्वरीत शासनाने दिनांक ६ जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाने गैर आदिवासींच्या विरोधात दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून गैर आदिवासींवर दंडात्मक कारवाई करावी व रिक्त होणा-या पदांवर ख-या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात याव्या, नियमाला डावलून कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये,आदिवासी विद्यार्थ्यांची डि.बी.टी. योजना त्वरीत बंद करण्यात यावी,महाविद्यालयीन प्राध्यापकांची भरती करतांना १३ पाँईंट रोस्टरचा आदेश रद्द करण्यात यावा,अधिसंख्य पदावर नियुक्त कर्मचा-यांना सेवा संरक्षण देणारा शासन आदेश रद्द करावा यासारख्या एकुन १६ मागण्या घेऊन जिल्ह्यातील आँल इंडिया आदिवासी एम्प्लाँईज फेडरेशन,गोंडियन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आँरगनायझेशन फाँर राईट्स आँफ ट्रायबल, गोंडवाना गणतंत्र पार्टी, अखिल भारतीय गोंडवाना पार्टी,आदिवासी विद्यार्थी संघ,गोंडवाना विद्यार्थी संघ, अखिल भारतीय परधान संघटना, कोयतुर एकजुट मंच,आदि.जनचेतनेचा जागर,बिरसा क्रांती दल,विर बाबुराव शेडमाके बहुउद्देशिय संस्था,जागतिक गोंड सगा मांदी,गोंडियन मातृशक्ती संघटना आदि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते‌.🌀💠🟢🟡 जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर करतांना प्राचार्य शांताराम उईके, सुधाकर कन्नाके, प्रमोद बोरीकर, विजय कुमरे, मनोज आत्राम, कृण्णा मसराम, कमलेश आत्राम, रजनीताई परचाके, जितेश कुडमते, रंजनाताई किन्नाके, बंडु मडावी, अशोक तुमडाम, सुरेश तोरे, विजय तोडासे , सारंग कुमरे,पलाश पेंदाम, संतोष सयाम , मन्साराम आत्राम, राजेंद्र धुर्वे , राजेंद्र किन्नाके,प्रमोद इरपाचे, संतोष कुडमते, अमृत आत्राम आदिं उपस्थित हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here