वाढदिवसाचे औचित्य साधुन सामाजिक कार्यकर्ता प्रमोद हावळेंने केले शासकीय रुग्णालयात पाणी दान ! 

0
535

विशेष प्रतिनिधी/✍🏻किरण घाटे

 

मराठवाडा /उस्मानाबाद -: शासकीय रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीच्या पाणी दान उपक्रमात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन सहभागी होऊन सामाजिक कार्यकर्ता प्रमोद हावळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवारी अंडी व पाणी दान केले.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सन्मानपत्र देऊन गौरविले. रुग्णालयात कर्तव्य बजाविणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान नाईकवाडी यांनाही त्यांच्या वाढदिवसा निमित्त शुभकामना देण्यात आल्या.या वेळी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ .सचीन देशमुख, डॉ गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान नाईकवाडी,परिचारिका संध्या निकम,कल्पना सोनवणे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंगुलभाऊ बनसोडे,संजय (बिटु) माळाळे,कुमार ओव्होळ,आसेफभाई पठाण, राजाराम बनसोडे,विजय बनसोडे,प्रसाद बनसोडे,शितल चव्हाण,शाहु धावारे,स्वराज जानराव,नितीन सोनवणे, सोमनाथ धावारे,सुनील चिलवंत,मयुर जानराव, नितिन मस्के,विकास बनसोडे,शितल कांबळे,हणुमंत मोरे,विजय गायकवाड तसेच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अ. लतिफ अ. मजीद गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,सचीन चौधरी उपस्थित होते. या शिवाय आज झालेल्या उपरोक्त कार्यक्रमाला शासकीय रुग्णालयातील कर्मचारी बांधव माेठ्या संख्येने हजर हाेते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here