यशस्वी शस्त्रक्रिया करणां-या डॉक्टरांचा सत्कार ! 

0
523

 

किरण घाटे /विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद मराठवाडा  – संपुर्ण देशात कोरोना जैविक विषाणुच्या महासंकटाने जनजीवन विस्कळित झाले आहे.त्यात मुकर मायकोसिस या रोगाने तोंड वर काढले असुन जनता अश्या संकटांचा सामना करित आहे, मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्या मध्ये मुकर मायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत.

जीवघेण्या या रोगांवर येथील डॉक्टरांनी पिडीत रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया केली असुन उस्मानाबाद येथे या रोगांवर उपचार व्यवस्था होत असल्याचे दिसून येते . मुकर मायकोसिस संसर्ग असणां-या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉ.सचिन देशमुख, डॉ.व्यंकटेश पोलावार,व

डॉ.श्रीकांत बलवंडे यांचा आज गुरुवार दि. २७मे ला रुग्ण कल्याण समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.ही यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजे आम्हा उस्मानाबादकरां साठी अत्यंत गौरवाची बाब असल्याचे मत रुग्ण कल्याण समिती सदस्य अ. लतिफ अ .मजीद यांनी व्यक्त केले .

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी कोरोना नंतर उद्भवलेल्या मुकर मायकोसिस संसर्गाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असतांना आरोग्य विभागाने जरी दक्षता बाळगली असली तरी नागरिकांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक असल्याचे ते या वेळी बाेलतांना म्हणाले . भाई उध्दवराव पाटील शिक्षक पत संस्थेच्या वतीने रुग्णालयात आवश्यक मेडिकल सामान व दीड लाख रुपये निधीचा धनादेश आज दिला .कार्यक्रमाला शल्यचिकित्सक डॉ धनंजय पाटील,आरएमओ डॉ.सचिन देशमुख, डॉ.व्यकटेश पोलावार, डॉ.श्रीकांत बलवंडे, डॉ.महेश कानडे,डॉ.सचीन गायकवाड,डॉ.सारंग कदम, डॉ.राहुल गायकवाड, अमरसिंह देशमुख,बालाजी तांबे,रौफ शेख,बाबासाहेब बनसोडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अ. लतिफ अ. मजीद,गणेश रानबा वाघमारे संजय गजधने सचीन चौधरी,रमेश गंगावणे, विजय सपकाळ, वैद्यकीय अधिकारी , परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here