महाराष्ट्र पोलीस संघटनेचे अध्यक्ष सचिन चौधरी यांच्या कडुन वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार !

0
547

महाराष्ट्र पोलीस संघटनेचे अध्यक्ष सचिन चौधरी यांच्या कडुन वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार !
उस्मानाबाद – किरण घाटे :- कोरोना जैविक विषाणुच्या महासंकटात आरोग्य विभागाने उत्तम कामगिरी बजावली आहे.उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांचा नियमित व वेळीच उपचार हाेत असल्याबद्दल आज सोमवार दि.२४मे ला येथील डाॅक्टर व परिचारिका यांचा सत्कार महाराष्ट्र पोलीस संघटनेचे अध्यक्ष सचिन चौधरी यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील,डॉ. सिमरन चव्हाण,इन्चार्ज वाहिदा शेख, मनीषा जगदाळे,स्नेहल वाघमारे यांना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर .एम .ओ. डॉ.सचिन देशमुख उपस्थित हाेते .सत्कार कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी गणेश पाटील, गोसावी,डॉ.महेश पाटील,अखिल भारतीय समता परिषदचे जिल्हाध्यक्ष महादेव माळी,रॉबिन बगाडे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अ.लतीफ अ .मजीद,सामाजिक कार्यकर्ता गणेश वाघमारे,इन्चार्ज नलीनी दल मंजन,रौफ शेख ब्रदर, जितेश होळकर आदीं मान्यवर हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here