एक पाऊल आरोग्याच्या दिशेने, शहरातील सर्व प्रभागात फवारणी करणे चालू

0
606

एक पाऊल आरोग्याच्या दिशेने, शहरातील सर्व प्रभागात फवारणी करणे चालू

गडचंदुर, प्रवीण मेश्राम : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे संपुर्ण गडचांदूर शहरात मच्छर नाशक फवारणी करण्यात येत आहे. कोरोना सारखा महाभयंकर आजार पूर्ण देशात पसरत आहे. त्याचसोबत आज डेंगू, मलेरिया, टायफाइट, चिकन गुनिया असे महाभयंकर आजारा ची पडसाद सर्वत्र दिसून येत आहे. यालाच लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्रजी वैद्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजुरा विधानसभा अध्यक्ष श्री अरुनजी निमजे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोरपना तालुका अध्यक्ष शरदभाऊ सुरेशराव जोगी न. प. उपाध्यक्ष गडचांदूर यांच्या प्रयत्नाने स्वखर्चातून ही मच्छर (कीटक) नाशक फवारणी गडचांदूर मधील सर्व प्रभागात करण्यात येत आहे. त्याच सोबत पूर्ण कोरपना तालुक्यातील सर्व गावा गावात मच्छर नाशक फवारणी करण्याचा शरदभाऊ सुरेशराव जोगी यांचा मानस आहे. त्यांच्या या महान कार्याला आम्हचा सलाम आहे. तसेच सहकार्य नगरसेविका कल्पनाताई निमजे, नगरसेविका अश्विनीताई कांबळे, नगरसेविका मिनाक्षीताई एकरे, रफिकजी निजामी, आबिद अलिजी, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल अरकीलवार, जिल्हा सचिव प्रविण काकडे, कोरपणा तालुका उपाध्यक्ष करण सिंघ भुराणी, तालुका सचिव प्रविण मेश्राम, तालुका कार्याध्यक्ष श्री सुरज कनाके तसेच गडचांदूर शहर अध्यक्ष प्रविणजी कोल्हे, युवक अध्यक्ष आकाश वराठे, सतीश भोजेकर, मयूर एकरे, वैभव गोरे, निखिल एकरे, मुनिर शेख, सदानंद गिरी, रोहन कुडसंगे, सतीश भोजेकर, प्रफुल मेश्राम आदी कार्यकर्ते सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here