कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरुच, अद्याप ताेडगा नाही

0
548

कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरुच, अद्याप ताेडगा नाही

चंद्रपूर, किरण घाटे – किमान वेतन लागू करा व सात महिण्यांचे प्रलंबित वेतन तातडीने द्या ! या प्रमुख मागण्यांसाठी येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालया समाेर डेरा आंदाेलन सुरुच असुन आज या आंदाेलनचा ८६वा दिवस असल्याचे आंदाेलनकर्त्यांनी एका भेटीत या प्रतिनिधीस सांगितले .महाभयानक काेराेना संकटात या कामगारांनी जीव धाेक्यात टाकुन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावून सेवा दिली . त्यांच्या उल्लेखनिय कार्यांचा गाैरव ही प्रशासनाने केला . पण आजच्या घडीला त्यांना कुठल्याही प्रकारचे थकीत वेतन न मिळाल्यामुळे त्यांचेसह त्यांचे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे .या आंदाेलनात तब्बल ५००कंत्राटी कामगार सहभागी झाले असुन या आंदाेलना बाबत अद्याप ताेडगा निघाला नाही .दरम्यान चंद्रपूर मनपाचे विद्यमान नगर सेवक पप्पू देशमुख यांनी वेळाेवेळी शासन व प्रशासनाचे आंदोलन कर्त्या कामगारांच्या रास्त मागण्यांकडे लक्ष वेधले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here