पोंभुर्णा तालुक्यात १० वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0
457

 

पोंभुर्णा तालुक्यातील दहावी एसएससी परीक्षा मार्च 2020 चा निकालात तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घाटकुळ या शाळेचा निकाल 97.505% टक्के लागला असून वैष्णव रवींद्र देऊरघरे 92.20 टक्के रिया उत्तम देशमुख 91.00% काजल चांगदेव राडेगावकर 88% टक्के गुण प्राप्त केले.चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय बोर्डाचा निकाल 94. 79 टक्के लागला अजून तन्वी रवींद्र दाणी 86.80 टक्के श्रुती गजानन गोरंटिवार 86.20 टक्के समिक्षा रवींद्र बुरांडे 85 टक्के, वैष्णवी मुरलीधर वासलवार 84.80% औचित्य अतुल कोपावार 84.80 टक्के गुण प्राप्त केले. राष्ट्रमाता विद्यालय देवाडा खुर्द शाळेचा निकाल 98. 50% लागला असून प्रदीप पिपरे 87.20% उत्कर्षा विजय देउरमले 81.40% , माधुरी गुरुदेव मंढरे 80.80 टक्के गुण प्राप्त केले. गंगाराम नाईक आश्रम शाळा धानोरा शाळेचा 98. 50 टक्के निकाल लागला असून संदीप पण्यालवार यांनी 88.55 टक्के, शासकीय आश्रम शाळा देवई चा निकाल 100% टक्के लागला असून भूषण छत्रपती गेडाम यांनी 70.20 टक्के गुण प्राप्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here