भूमिपुत्र शेतकरी संघटना आर्णी तालुकाध्यक्ष पदी देवानंद पवार यांची नियुक्ती

0
328

 

समीर मलनस
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

आर्णी तालुका:
सतत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना, आदरणीय संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत जी भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत भूमिपुत्र शेतकरी संघटना चे विशाल राठोड युवक यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आर्णी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. भूमिपुत्र शेतकरी संघटना आर्णी तालुका अध्यक्ष पदी देवानंद पवार तर सचिव पदी पवन पवार यांची नियुक्ती करण्यात आली तर तालुका उपाध्यक्ष धरम राठोड, सहसचिव नानू राठोड ,सरचिटणीस चेतन पवार, संघटक अमोल पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सर्व पदाधिकारी युवक जिल्हा अध्यक्ष विशाल राठोड यांनी नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व शेतकरी यांचे प्रश्न सोडविल्या जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here