तब्बल 22 वर्षानंतर डिएड वर्ग मित्र-मैत्रिणींचा स्नेहमिलन सोहळा
प्रतिनिधी: अमोल राऊत
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) बाबूपेठ, चंद्रपूर येथील छात्रशिक्षक म्हणून सन 1996-98 या दोन वर्षात प्रशिक्षण घेऊन आपापल्या परिसरात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मूल येथील शिक्षक मित्र-मैत्रिणींनी सोमनाथ या पर्यटन स्थळी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यात असणाऱ्या आपल्या वर्ग मित्र-मैत्रिणींना एकत्र आणण्याचा योग जुळवून आणला.
सर्वप्रथम स्नेहमिलन सोहळ्यात उपस्थित झाल्यानंतर सर्वांनी आपला परिचय व अनुभव दिल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात स्वतंत्रकुमार शुक्ला व नंदू म्हस्के यांचा सहभाग होता. तसेच प्रमोद कोरडे यांचा केंद्रप्रमुख झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मृत पावलेल्या वर्ग मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर परिसरात भ्रमण करून एकमेकांशी हितगुज करण्यात आले. सदर स्नेहमिलन सोहळ्याच्या आयोजनासाठी सुरेश जिल्हेवार, माणिक पाटेवार, प्रशांत कंडे, राजू देऊळवार, किशोर लांडे, राजू घोरुडे, ज्योती निमगडे (सूर्यवंशी), रजनी रामगिरवार, नीलिमा शेंडे आदी मूल येथील शिक्षक, मित्र-मैत्रिणींनी अथक परिश्रम घेतले. उपस्थित सर्वांनी त्यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाला राजू चिंचोलकर, श्रीकृष्ण वडस्कर, वैशाली वडस्कर, सुचिता पोन्नलवार, सुनीता टिपले, उर्मिला लांडे, राजेश दुर्गे, दर्शन कोंतमवार, राजेश बोकडे, मुन्ना डेकाटे, कांचन लांबट, उमेश शेरकुरे, तुकाराम उरकुडे, अरविंद भगत, गोपाळ केंद्रे, प्रफुल वानखेडे, प्रकाश कटाईत, सोपान सावळे, विनोद वंजारी, विजय निवलकर, सुरेश मोरे, गजेंद्र सावरबांधे, माधव बन्सोड, बाबू मामिलवाड, मारोती जीवतोडे, हरिदास गोनाडे, शारदा बेले, विजया हटवार, अनामिका सांगोळकर, शंकर मेश्राम आदींची उपस्थिती होती. शेवटी सर्वांनी सहभोजन करून आपापल्या गावाकडे प्रस्थान केले.