चंद्रपूरात बंडू धाेतरेंचे अन्नत्याग आंदोलन सुरु ! आंदाेलनाचा ७वा दिवस ! यंग चांदा ब्रिगेडचा आंदाेलनाला पाठिंबा !
🟤🟡🟢🔴🟠चंद्रपूर🟢🔴किरण घाटे🔵जिल्हा प्रतिनिधी🟤🟡 इको-प्रो संस्थे अंतर्गत दि. २२ फेब्रुवारी २०२१ पासून रामाळा तलावा समोर मंडप टाकून इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी ” अन्नत्याग सत्याग्रह ” सुरू केले असुन आज या आंदाेलनाचा ७ वा दिवस आहे. .🟠🟤🟣🟢🔴🔴🟡🟡🟢🟤विदर्भात सामाजिक कार्यात सदैव अग्रणी असणा-या शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या मुख्य संघटीका तथा सामाजिक कार्यकर्त्या वंदना हातगांवकर , दुर्गा वैरागडे , वैशाली रामटेके , आशा देशमुख , काैसरखाँन , चंदा इटनकर , कल्पना गिरडकर, सविता दंडारे आदिं महिला कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदाेलनाला भेट देवून आपला पाठिंबा जाहिर केला आहे.🟡🟣🟢🔴🟠🟤🟢🔴🟡🔶बंडु धाेतरे यांनी केलेली मागणी याेग्य व रास्त असल्याची प्रतिक्रिया वंदना हातगांवकर यांनी काल (शनिवारी )या प्रतिनिधी साेबत बाेलतांना व्यक्त केली विशेष म्हणजे या विधान सभा क्षेत्राचे विद्यमान अपक्ष आमदार किशाेर जाेरगेवार यांनी या पुर्विच या आंदोलन मंडपाला भेट देवून आंदोलन कर्त्यांच्या मागण्या जाणुन घेतल्या आहे .
