सरस्वती ज्ञान मंदिर , नागभीड येथे वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा

0
388

 

अरुण रामुजी भोले

नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड—-स्थानिक सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड येथे दिनांक २८ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ दरम्यान वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष संजयजी गजपुरे यांच्या वाढदिवशी २८ डिसेंबर ला सदर महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम शाळेच्या वतीने संस्थाध्यक्ष संजयजी गजपुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

क्रीडा स्पर्धेत खो-खो, कबड्डी इत्यादी सांघिक खेळ घेण्यात आले . तसेच शंभर मिटर धावणे,चमचा गोळी,लंगडी,पोते शर्यत यासह विविध क्रीडा प्रकार घेण्यात आले व सरते शेवटी संस्थाध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्य शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले.दिनांक ३१ डिसेंबर रोजी एकल नृत्य,गितगायन,समूहनृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सोहळ्याने या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सांगता झाली.

सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सहा.शिक्षक आशिष गोंडाने व उपस्थित प्रमुख अतिथी यांनी माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले यानंतर भाषणातून व गितगायनातून विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला . सहा. शिक्षिका आशा राजूरकर ,पूजा वीर ,भावना राऊत यांनी सुंदर अश्या गीतातून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष गोंडाने व प्रमुख अतिथी आशा राजूरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे संचालन वर्ग ७ वीची विद्यार्थीनी कु.सेजल रवींद्र जांभूळे हिने केले तर आभार वर्ग ७ ची विद्यार्थीनी कु.सानिया गजपुरे हिने मानले. सदर महोत्सव मुख्याध्यापक गोकुल पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.शिक्षिका किरण वाडीकर , आशा राजूरकर, पूजा वीर,भावना राऊत, अंकीता गायधने, श्रद्धा वाढई, सहा.शिक्षक आशिष गोंडाने, पराग भानारकर, सतीश जीवतोडे यांनी यशस्वीपणे पार पाडला.

=====

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here