‘वेकोलीत स्थानिकांना रोजगार द्या’ यंग चांदा ब्रिगेडची मागणी

0
581

‘वेकोलीत स्थानिकांना रोजगार द्या’ यंग चांदा ब्रिगेडची मागणी

साेमवारी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
🟤🔴🟣🔶चंद्रपूर🟢🔶🟤किरण घाटे🔶🟢🟣वेकोलीत स्थानिक युवकांना रोजगार द्या या प्रमुख मागणीकरीता सोमवार दि. १५ फेब्रुवारीला आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. 🟣🔶🟢🟤🔴🔴🔵🟠या मोर्चात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यासह हजारो युवक युवती सहभागी होणार आहे.
🔶🔴🟢🟤🟣🟠🔵🟡🔵चंद्रपूरात सर्वत्र वेकोलीची जाळे पसरले आहे. याचा मोठा दुष्यपरिणामही प्रदुषणाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. असे असले तरी या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार दिल्या जात नाही. 🔴🟣🟤🟠🟢🟡🔶🟠🟣परिणामी उद्योग असूनही येथे बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामूळे वेकोली अंतर्गत चालणा-या विविध कंपण्यांमध्ये स्थानिकांना रोजगार द्या या प्रमूख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 🟠🟣🔶🟡🟤🟤🔴🔵🟤सकाळी ११ वाजता या मोर्चाला गांधी चौकातुन सुरुवात होणार आहे. त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गाने होत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकनार आहे. 🟣🟤🟠🔵🔴🟡🔶🟢❇️सदरहु मोर्चात जिल्ह्याभरातून हजारोच्या संख्येत नागरिक सहभागी होणार आहे.🔶❇️🟤🟡🔴🟠🟠🟢🟣🟠उपराेक्त मोर्चा साठी मागील पंधरा दिवसापासून विविध ठिकाणी बैठका घेत जनजागृतीही करण्यात आली आहे.🟣🔵🟠🟢🟤🔴🟡🔶मोर्चात बेरोजगारींच्या संकटामूळे ओढावलेल्या संकटावर आधारीत झाकीचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. 🔶🟠🟡🔴🟤🟢🟣🔵🟤🔴🟡आयाेजित मोर्चात बेरोजगार यूवक व चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here