मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपुर च्या वतीने मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

0
455

मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपुर च्या वतीने मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

आवाळपूर / प्रतिनिधी : मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपूर, जिल्ह्यातील निवळक तालुक्यात अविरतपणे काम करीत आहे, मॅजिक बस च्या माध्यमातून 12 ते 16 वयोगटातील विद्यार्त्यांसाठी खेळाच्या माध्यमातून, शिक्षण, जीवन कौशल्य, विकास कार्यक्रम स्केल (SCALE) कार्यक्रमा अंतर्गत कोरपना तालुक्यातील 5800 विद्यार्थ्यांसोबत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य हा कार्यक्रम राबवित आहे.

त्याच अनुशंगाने मॅजिक बस इंडिया फौंडेशन च्या वतीने गट संसाधन केंद्र कोरपना व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेला कोरपना तालुक्यातील एकूण 77 शाळेतील मुख्याध्यापक तथा सहाय्यक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला.

मॅजिक बस इंडिया फौंडेशन च्या वतीने कोरपना तालुक्यातील 82 शाळेत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य, हा उपक्रम राबविला जात आहे या उपक्रमात शिक्षण, जीवन कौशल्य, रोजगार कौशल्य, गावाचा व शाळेचा विकास हे शिकवून नवीन सुजाण सुशील पीडी निर्माण करून बाल मजुरी बाल विवाह प्रतिबंध असे नवीन उपक्रम राबवून परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न मॅजिक बस करीत आहे. त्या साठी समाजातल्या प्रत्येक घटका सोबत मॅजिक बस खेळातून विकास, शिक्षण, जीवन कौशल्य हा उपक्रम राबवित आहेत.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या बावणे केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून प्रशांत लोखंडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर, जुनघरे सर केंद्र प्रमुख, तोडे सर केंद्रप्रमुख तालुक्यातील 77 शाळेतील मुख्याध्यापक हे उपस्थित होते.
तर हा कार्यक्रम पाचपाटील साहेब गट विकास अधिकारी कोरपना, तसेच आनंद धुर्वे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपना यांच्या निदर्शनात व मॅजिक बस चे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री , प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणात पार पाडण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन भांडारवार सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॅजिक बस चे सुपडा वानखडे तालुका समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकेश भोयर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here