परिवहन बसचा अपघात प्रवाशी थोडक्यात बचावले

0
266

परिवहन बसचा अपघात प्रवाशी थोडक्यात बचावले

▶️ब्रेक फेल पण झाडामुळे बचावले.
▶️पहाडावरून येताना “नोकारी” जवळ बस अपघात.
▶️शाळकरी मुलांसह प्रवासी जखमी.
गडचांदूर/-
जिवती तालुक्यातील येल्लापूर वरून गडचांदूरकडे येणाऱ्या राजूरा आगाराच्या बस क्रमांक MH 12 EF 6979 ला मौजा नोकारी(बैलमपूर) जवळ अपघात झाल्याची घटना सकाळी २६ डिसेंबर रोजी अंदाजे सकाळी ११ च्या सुमारास घडली.सदर बस मध्ये विविध गावातील शाळकरी विद्यार्थ्यांसह अंदाजे ४० च्यावर प्रवासी प्रवास करीत होते.पहाडावरून उतरताना अचानकपणे ब्रेक फेल झाले आणि रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात बस पलटली मात्र झाडामुळे थोडक्यात प्रवसी बचावल्याची चर्चा अपघातात स्थळी ऐकायला मिळत होती.१०८ ला उशीर होत आल्याचे पाहून स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने खाजगी वाहनाद्वारे प्रवाशांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.१२ प्रवासी किरकोळ जखमी असून सुदैवाने जीवित हानी नाही.यात काही वृद्ध महिला व पुरुषांचही समावेश आहे.
राजूरा आगारात नवीन बसेस उपलब्ध असताना पहाडावर जुन्या,भंगार स्वरूपाच्या बसेस पाठवण्यात येत असल्याने असे अपघात घडतात तसेच बस वेळे अभावी चालत असल्याने विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी उशीर होत असल्याने याविषयी अगार प्रमुखांना निवेदन देण्यात आल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली असून “शहरांकडे नवीन आणि जोखमीच्या ठिकाणी जुन्या बसेस” पाठवत असल्याने प्रवासी जीव मुठीत घेवून प्रवास करित असल्याचे आरोप होत आहे.पहाडावर नवीन व वेळेत बसेस पाठवा अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here