विचित्र अपघातात दोन जण ठार तर एक जखमी

0
323

 

उभ्या वाहनांला धडक; पेट्रोल पंपात शिरला ट्रक

 

देवेंद्र भोंडे

अमरावती/नांदगाव पेठ -: महामार्गावर घडलेला विचित्र अपघातात दोन जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४:३० वा.च्या सुमारास येथील अनुराधा पेट्रोल पंप वर घडली.अनियंत्रित ट्रकने आधी दोन उभ्या मालवाहू वाहन ला धडक दिली. नंतर तो ट्रक पेट्रोल पंप च्या आवारात शिरल्याने पेट्रोल पंप कर्मचारी देखील गंभीर जखमी झाला आहे.
चालक लालबाबु मो आयुब.४५ व वाहक मालहैफूज आलम मोहम्मद बद्रूल २५ दोघेही रा.कुमाई,बिहार. अशी मृतांची नावे आहेत..बुलढाणा येथून मिरची घेऊन निघालेल्या डब्ल्यू बी २३सी ८७०० क्रमांक चा ट्रक नागपूर कडे भरधाव वेगाने जात असतांना.ट्रक चे नियंत्रण सुटले.अनुराधा पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या दोन मालवाहू वाहनाला त्याने जबर धडक दिली.अनियंत्रित ट्रक पेट्रोल पंप परिसरात शिरला. यामध्ये पेट्रोल पंप कर्मचारी मंगेश पकडे जखमी झाला. तर अनियंत्रित ट्रक मधील चालक-क्लिनर जागीच ठार झाले. पेट्रोल पंप वरील कर्मचार्यांनी तातडीने नांदगाव पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे यांच्या सह पोलीस घटना स्थळी दाखल झाले…

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here