अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाऊंडेशन आवाळपुर चा पुढाकार.
आवाळपुर;:- कोरपना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सांगोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे ध्येय ठेऊन महाराष्ट्र शासनाने ‘जिल्हा परिषद’ शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेची आवड लागण्यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली .
या योजणे अंतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते. अगोदर शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजविताना स्वयंपाक गृहात लाकडी काडयांचा वापर होत होता. त्यामुळे वायु प्रदुषण होते. हा प्रकार बंद होण्यासाठी ” अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूरने” पुढाकार घेत ‘जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सांगोडा येथे गँस सिलेंडर चे वाटप नुकतेच करण्यात आले. त्यामुळे ही शाळा आता धुरमुक्त होणार आहे.
यावेळी गावाच्या विकासाठी सतत झटणारे सांगोडा गावचे सरपंच सचिन बोंडे, अल्ट्राटेक चे अधिकारी संजय पेठकर, सचिन गोवरदीपे, यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक दिलीप शेंडे यांच्याकडे गॅस सिलेंडर हस्तगत केले. यावेळेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण घोगरे,शिक्षिका सौ.शोभा शेंडे, विकासाचे देविदास मांदांडे आदींची उपस्थिती होती.