विद्यापीठाचे दीक्षांत समारंभ गडचिरोलीतच घ्या : युवक काँग्रेसचे मुंडन आंदोलन

0
480

विद्यापीठाचे दीक्षांत समारंभ गडचिरोलीतच घ्या : युवक काँग्रेसचे मुंडन आंदोलन

गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ यावर्षी चंद्रपुरात २८ जानेवारीला घेण्यात येणार आहे. हा दीक्षांत समारंभ गडचिरोलीतच घ्यावा ,अन्यथा विद्यापीठाला घेराव आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला असून सोमवारी (११ जानेवारी) विद्यापीठ परिसरात मुंडन व ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०१९-२० च्या पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक तसेच पदवी दान करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठात दरवर्षी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात येते. यानुसारच यावर्षी विदद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ २८ जानेवारीला चंद्रपुरात आयोजित करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पूर्ण तयारीही सुरू केली आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत असून आतापर्यंत सातही दीक्षांत समारंभ गडचिरोली येथेच घेण्यात आले. यात कोणतीही बाधा निर्माण झाली नाही. विदद्यापीठाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाचे कुलपती येणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पर्यायाने जिल्ह्यातील शैक्षणिक समस्या कुलपतींना अवगत होतील, अशी आशा येथील शिक्षणप्रेमींना होत्या. मात्र, काही तांत्रिक कारण पुढे करून सदर दीक्षांत समारंभ चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आल्याने हा गडचिरोली जिल्ह्यावर अन्याय असल्याचेही युवक काँग्रेसने म्हटले आहे.
विद्यापीठाचे कामकाज गडचिरोली येथून सुरू आहे. असे असतानाही विद्यापीठ परीसरात दीक्षांत समारंभ का घेण्याचे येत नाही, असाही प्रश्न युवक काँग्रेसने उपस्थित करून विद्यापीठ प्रशासनाने चंद्रपूर येथे दीक्षांत समारंभ सघेण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.
विद्यापीठ परिसरात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आला असून यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन करून चंद्रपूर येथे दीक्षांत समारंभ घेण्याच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विश्वजीत कोवासे, तेजस मडावी, मिलींद बागेसर, रितेश राठोड, एजाज शेख, बालू मडावी, गौरव ऐनप्रेडीवार, संजय गावडे, दीपक ठाकरे, घनश्याम मुरवतकर, चुळाराम उडान, निलेश गिरी, मयूर गावतुरे, अभय माजेश्वर, विपूल एलेट्टीवार, खुशाल कुंभारे, निपंेंद्र आतला, बादल मडावी, नितीन गिरडकर, विकास राऊत, संदीप तिमांडे, प्रेमानंद गोंगल, राहूल पत्तेवार, नाना बोडावार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here