विविध उपक्रम राबवून साजरा झाला पतंजली योग समितीचा स्थापना दिन !

0
546

विविध उपक्रम राबवून साजरा झाला पतंजली योग समितीचा स्थापना दिन !
🟢☀️💠चंद्रपुर💠🌼किरण घाटे🟣🟪
पतंजली योग पीठ द्वारा हरिद्वार द्वारा संचालित पतंजली योग समितीचा 26 वा स्थापना दिवस आणि भारत स्वाभिमानचा 12 वा स्थापना दिन नुकताच राजुरा येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विधिवत हवन भावना भोयर,आणि अलका गंगशेट्टीवार यांनी केले. ☀️💠🌼यावेळी तालुका प्रभारी एम .के .सेलोटे यांनी समाज कल्यासाठी विविध उपक्रमांची माहिती दिली.🟪☀️🟢🟣भारत स्वाभिमान चे तालुका प्रभारी पुंडलिक उराडे यांनी योगगुरू बाबा रामदेव यांनी कशा प्रकारे योग आणि प्राणायाम उपयुक्त आहेत ते जनतेच्या आरोग्यासाठी नियमित करणे किती आवश्यक आहे हे उपस्थितांना पटवून दिले.
🟢🟪🟣उराडे यांचे वाढ दिवसा निमित्त त्यांना अमृतवेल आणि इतर औषधी रोप देऊन व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
🟢☀️💠🟪यावेळी वृक्षा रोपण करण्यात आले. कृतिका सोनटक्के अनिल चौधरी, गंगशेट्टटीवार आदिंनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अँड. मेघा धोटे यांनी केले तर आभार प्रा कुईटे यांनी मानले.
महाप्रसाद वितरण करून या कार्यक्रमाची सांगता झाली
🌀🟪☀️🟢कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी. सरोज हिवरे, एम. के .सेलोटे भावना भोयर, अलका ताई पुष्पा गिरडकर, विठ्ठलराव हिवरे, जोत्सना नंदर्धेने वर्षा घोगरे कृतीका सोनटक्के अधिवक्ता मेघा धोटे यांचे विशेष सहकार्य लाभले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here