ग्राम पंचायत निवडणूका! 🟣🌀मी उमेदवार बाेलताेयं – चिमूर तालुक्यातील नेरी प्रभाग ५चे उमेदवार सुरेश कामडी
☀️🌀चंद्रपुर 🌀🟣किरण घाटे 🛑🟣येत्या १५जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राम पंचायतच्या निवडणुका पार पडत आहे प्रत्येक उमेदवाराचे प्रचार कार्य जाेमाने सुरु आहे काही तालुक्यात तिरंगी व चाैरंगी लढतीचे चित्र द्रूष्टीक्षेपात पडत आहे .चिमूर तालुक्यातील काही गावात हिच परिस्थिती आहे . याच निमित्ताने या प्रतिनिधीने नेरीच्या प्रभाग पाच मधील नाट्य कलावंत तथा नेरी व्यापारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुरेश कामडी यांचे मनाेगत जाणून घेतले ते त्यांचेच शब्दात देत आहाे .सुरेश कामडी या निवडणूकीच्या संदर्भाने काय म्हणाले !☀️🟣☀️🛑🌀🟪 ☀️🌼सन २०२१ ग्राम पंचायत नेरी च्या सार्वत्रिक निवडणूक निमित्ताने मी सुरेश नारायण कामडी प्रभाग क्रमांक ५ मधुन ना. मा. प्रर्वगातुन अपक्ष (अधिकॄत) उमेदवार म्हणुन उभा आहे. मला धरुन ६ उमेदवार १) भोजराज दादाराव कामडी २) चंद्रभान दादाराव कामडी ३) रामचंद्र ताराचंद कामडी ४) ज्ञानेश्वर सुभाष खाटीक ५) सुरेश नारायण कामडी ६) संदिप भिवा हिंगे हे उभे असुन दोन उमेदवार प्रबळ पक्षांकडुन आहेत . 🟣🛑भाजपा समर्थीत पॅनल कडून डॉ. श्याम हटवादे ,, कमलाकर लोणकर , संदिप पिसे ,,गुरु पिसे, नरेन्द्र पंधरे व इतर !तर काॅग्रेस समर्थीत पॅनल कडुन संजय डोंगरे , प्रा . राम राऊत , मनोहर पिसे , रविन्द्र पंधरे , गुलाबराव पिसे, पंचायत. सभापती लता पिसे, अरुण पिसे , माजी सभापती शोभाताई पिसे , व इतर मान्यवर यांनी ग्राम पंचायत सदस्य निवडुन आणण्यासाठी जंग-जंग पछाडत आहेत .
🟣☀️🌀याच प्रभागातील माय- जनतेनी सन २०१० मध्ये याच प्रर्वगातुन मला समस्त नेरी तुन सर्वोच्च रेकार्ड मताने निवडुन दिले होते . 🌀🟣🌼🟪पण गलिच्छ राजकारणातुन मला पदापासून डावलण्यात आले होते. 🌀जनता म्हणते -सतरा सदस्यीय ग्राम पंचायत मध्ये एकटा काय करेल . पण हे जनतेचे म्हणने- मी पुसुन काढण्यात यशस्वी पण झालोय . एकटाच पुरुन उरणार! हा प्रण मनाशी बाळगून ग्राम पंचायत अधिनियमा चा सतत अभ्यास केला . चिंतन- मनंन केले 🟣🌀🟪ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्याकडे दुर्लक्ष करुन अभ्यासात लक्ष केंद्रित केले. आज जे काही आहो ! ते माझ्या विरोधकांमुळेच . !खरे तर तेच माझे गुरू ही !. त्यांनी विरोध केलाच नसता तर मी अधिनियमाचा जाणकारही झालो नसतो. 🟣🟪☀️🛑🟢💠
त्या पाच वर्षाच्या काळात एकटा काय करु शकतो हे समस्त जनतेनी पहालय! .
यावेळी इच्छा नसतांनाही खास मतदारांच्या आग्रहाखातर अगदी अंतीम क्षणी ५वाजता उमेदवारी फार्म भरण्यांस गेलाे . 🟪🌀🟣☀️🛑💠
आजच्या परिस्थितीमध्ये पानटपरी, गुत्या गुत्यांवर निवडणूकी चर्चा रंगतेय ! तेव्हा असे ऐकिवात येत आहे की, यावेळी फक्तनी फक्त अपक्ष उमेदवारांनाच निवडुन आणायचं! 🌀🟣🟪🛑कारण एखाद्या पॅनल कडुन आलेल्या उमेदवारांना विकासाची कामे सांगीतले तर तो वरिष्ठांशी चर्चा करुन कळवतो. !असे परावलंबी उमेदवार पेक्षा स्व:ता निर्णय घेणा-या सक्षम अपक्ष उमेदवारालांच निवडुन द्यायचं अस ठरवल्या जात असल्याने दोन्ही पक्षांच्या पॅनल वाल्यांची दमछाक होतांना दिसते आहे
सरपंच बनायला कर्तृत्व व नसिबाची ची गरज असते .आणि हा योग जर का मला मिळाला तर १५आॅगष्टला गावातुन दहावी मधुन जास्त percentageनी आलेल्या व २६ जानेवारीला बारावी मधून आलेल्याच्या हातानेच झेंडावंदन करेन ! 🛑🟪🌀☀️💠🟪🛑💠☀️गावविकासाठी दिवस रात्र कोणताही विरोध न बाळगता मी झटेन ! या भुतलावरुन गेल्यावरही माझे भविष्यातील पिढीसाठी उदाहरण असेल! असेचं कार्य करेन निवडुन येण्यापुरते व सरपंच होण्या पुरते ! माझे हे शब्द नसुन मी जे बोलतो अगदी तेच करतोय! ही खरी वास्तविकता आहे.🌼
