मराठी अस्मिता पुरस्कार 2022 चे मानकरी कुणाल वांगलवार सन्मानित 

0
380

मराठी अस्मिता पुरस्कार 2022 चे मानकरी कुणाल वांगलवार सन्मानित 

 

 

कोरपना प्रतिनिधी

पालकमंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व फिल्म अभिनेता अतुल परचुरे यांनी केले सन्मानित. या वेळी अन्य मान्यवर मंचावर हजर होते.

नुकताच चंद्रपूर येथे नवराष्ट्र मराठी अस्मिता पुरस्कार 2022 हा सत्कार सोहळा राधाकृष्ण सभागृह येथे संपन्न झाला.यात एलेक्सटी म्युच्युअल बेनिफिट निधी लिमी.अर्थात ए एम बी निधी लिमिटेड चे गडचांदूर येथील शाखेचे व्यवस्थापकीय संचालक कुणाल प्रभाकर वांगलवार यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार , जिल्हाधिकारी अजय गुल्हाने फिल्म अभिनेता अतुल परचुरे ,गोडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे,नवभारतचे महाव्यवस्थापक शेखर चांदले,शेत्रिय व्यवस्थापक राहुल कविस्कर, प्रामु ख्याने हजर होते. यावेळी 39 व्यक्ती ज्यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात नाव लोकिक मिळवले आहे अश्या राजकीय,सामाजिक, सांसकृतिक क्षेत्रात आपले नाव लोकिक केलेल्या मान्यवरांचा नवराष्ट्र मराठी अस्मिता अवॉर्ड 2022 मे सन्मान पत्र,मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्यात AMB निधी लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक कुणाल प्रभाकर वांगलवार याना उत्कृष्ट व्यवस्थापकचा पुरस्कार देण्यात आला सभेचे संचालन प्रशांत विग्नेश्र्वर यांनी केले तर आभार प्रशांत चाहांदे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here