केंद्र सरकारचे कृषी विधेयक रद्द करावे याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष वर्धा चे चक्का जाम आंदोलन
अनंता वायसे

प्रहार जनशक्ती पक्ष जि. वर्धा नामदार श्री. बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री यांच्या आदेशानुसार “जर आपल्या 7/12 वाजवायचा असेल तर 8/12 मध्ये शामिल व्हा” मा. नामदार बच्चूभाऊ कडु यांनी दुचाकी ने दिल्ली ला पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात करिता हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन निघाले आहे ,बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र श्री.गजुभाऊ कुबडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच वर्धा जिल्हा प्रमुख श्री. जयंतभाऊ तिजारे यांच्या मार्गदर्शनाखाली व समुद्रपूर तालुका प्रमुख श्री. प्रमोदभाऊ म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी काळा कायदा रद्द करण्याकरीता दिनांक 08 डिसेंबर 2020 रोज मंगळवार ला सकाळी 10:00 वाजता हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तालुक्यातील सर्व प्रहार कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी नागपूर- चंद्रपूर हायवे शेडगाव चौरस्ता येथे चक्का जाम आंदोलनात सहभाग घेऊन यावेळी स्वामिनाथन आयोग लागू करावा ,शेतकऱ्यांनवरील आंदोलनातन्मक गुन्हे मागे घ्यावे व केंद्र सरकारने घाईने लागू केलेला काळा कायदा रद्द करावाअश्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या यावेळी जय जवान जय किसान, किसानो के सन्मान मे बच्चूभाऊ मैदान मे काळे कायदे रद्द करावे अश्या प्रकारे चे नारे देण्यात आले नारे देत असतांनी पोलिसांनी प्रहार कार्यकर्ते व शेतकऱ्यांना अडवून समुद्रपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले नंतर सर्वांनची सुटका करण्यात आली यावेळी श्री. प्रमोदभाऊ म्हैसकर समुद्रपूर तालुका प्रमुख,श्री.विष्णूभाऊ घरद माजी समुद्रपूर तालुका प्रमुख, श्री. जगदीशभाऊ तेलहांडे हिंगणघाट तालुका प्रमुख,हंसराज बेलखोडे सेलू तालुका प्रमुख, नितेशभाऊ भोमले सेलू तालुका उपप्रमुख,सुरज आष्टनकर सिंदी रेल्वे शहर प्रमुख, ,सचिन पेटकर, रज्जत डंभारे, रविंद्र डंभारे,रमेश डंभारे,वेदांत डंभारे,रविभाऊ धोटे, उमेश टमगिरे, सोनू डंभारे,रणजित येडे,संकेत म्हैसकर,यश घुगरे,मोहन नागपुरे,आकाश खुळे बंटी चौधरी, आकाश झाडे, अमोलभाऊ झाडे, अतुल गुजरकर, अमित पाटील प्रशांत कातोरे, शुभम सुरकार, नुतन बेलखोडे,प्रधनशील देव,भूषण जिकार,बालु घाटे व शेतकरी कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.