भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यसम्राट आमदार माननीय श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांची अनेक ठिकाणी सदिच्छ भेट.

0
607

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यसम्राट आमदार माननीय श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांची अनेक ठिकाणी सदिच्छ भेट.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दादर चैत्यभूमी या ठिकाणी बुद्ध वंदना व प्रार्थना घेण्यात आली त्या ठिकाणी उपस्थितीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सन्माननीय श्री. देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते विधान परिषद श्री. प्रवीण दरेकर साहेब आमदार श्री.भाई गिरकर, आमदार श्री. कालिदास कोळंबकर, मुंबई भाजपाध्यक्ष श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या सोबत श्री. शंकर कांबळे मुंबई भाजपा यांनी अभिवादन सभेत भाग घेऊन दर्शन घेतले.

तसेच वडाळा- माहिम विधानसभा वार्ड क्रमांक: १९२. डाॅ. बाबासाहेबांना वंदना करताना खालील ठिकाणी साहेबांनी भेट दिली.
१] डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर हाॅ. सोसायटी. दादर,
२] अबु कसाई चाळ, दादर,
३] नालंदा बुद्ध विहार, दादर,
४] महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, दादर येथे उपस्थितीत होते.

तसेच कार्य सम्राट आमदार माननीय श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या भेटीला मुंबई दुरदर्शनचे कॅमेरामेन तसेच नव केसरी वृत्तचे सह संपादक पत्रकार व प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे मुंबई विभाग अध्यक्ष, बाळकडु वृत्त चे प्रतिनिधी श्री. महेश कदम यांनी वार्ड क्रमांक: १९२ मधील जनसंपर्क कार्यालयात भेट दिली, विभागातील अनेक सोसायटी व पोलिसातील वस्तीगृह संदर्भात चर्चा करण्यात आली. आमदार साहेब आठवडयातुन दोन दिवस मंगळवार व शनिवार सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजे पर्यंत जनतेच्या समस्याचे निवारण करण्यासाठी येतात. ह्याच दरम्यान डाॅ. अतुल सोनावणे व वडाळा विधानसभा उपाध्यक्ष श्री जितेंद्र कांबळे साहेब यांच्या वाढदिवस देखील साहेबांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आले.

नालंदा बुद्ध विहार येथे मेन गेट बांधण्याचे भुमी पुजन करण्यात आले. यात प्रमुख उपस्थिती श्री. जितेंद्र कांबळे साहेब (उपाध्यक्ष वडाळा विधानसभा), विजय डगरे, डाॅ. अतुल सोनावणे, एकनाथ संगम, संदिप तिवरेकर, संदिप पानसांडे, निलेश नायकर, कौशिक सर, संतोष शिंदे, शैलेश यादव, जयंत नटे, रविंद्र बामणे, शास्त्रीजी, बाबु मिठाईवाला, नरु ठाकुर, मनोज शहा, संतोष गुरव, अक्षता तेंडुलकर, प्रतिक्षा सावे, सुप्रिया प्रभु व ईतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here