मूलचे भूतपूर्व शिवसेना शहर प्रमुख भास्कर खाेब्रागडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश !

0
543

मूलचे भूतपूर्व शिवसेना शहर प्रमुख भास्कर खाेब्रागडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश !

किरण घाटे

गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेत असणारे मूलचे यूवा नेते तथा भूतपूर्व शिवसेना शहर प्रमुख भास्कर खाेब्रागडे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह विजया दशमी दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे व्रूत्त आहे .सदरहु प्रवेश खाेब्रागडे यांनी चंद्रपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा OBC विभागाचे प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, राष्ट्रवादी मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन पिंपळशेंडे, तालुका अध्यक्ष गंगाधर कुनघाडकर,विधानसभा अध्यक्ष सोनल मडावी, महिला तालुकाध्यक्षा निता गेडाम, व शहर महिला अध्यक्षा अर्चनाताई चावरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत केला. या प्रसंगी अनेक शाखा प्रमुख हजर हाेते . भास्कर खाेब्रागडे साेबतच मूल शहराच्या अनेक वार्डातील महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्वादीत प्रवेश केला असल्याचे खाेब्रागडे यांनी इम्पँक्ट -२४च्या प्रतिनिधीशी आज बाेलतांना सांगितले . जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणां-या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे. दरम्यान या कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे मूल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास व आशावाद वैद्य यांनी या वेळी आपल्या बाेलण्यातुन व्यक्त केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here