यंग चांदा ब्रिगेडच्या भाऊबीज कार्यक्रमांची यशस्वी सांगता !

0
567

यंग चांदा ब्रिगेडच्या भाऊबीज कार्यक्रमांची यशस्वी सांगता ! आ.किशाेर जाेरगेवार, वंदना हातगांवकर तथा भाग्यश्री हांडे यांची प्रामुख्याने कार्यक्रमांना उपस्थिती ! चंद्रपूरातील अनेक वार्डात झाले कार्यक्रम ! उपक्रमास मिळाला महिलांचा उत्तम प्रतिसाद ! 

चंद्रपूर किरण घाटे

गेल्या १७नाेव्हेंबर पासून यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक तथा चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोर्गेवार यांनी चंद्रपूर मध्ये प्रत्येक वार्डात वार्ड समितीच्या नेतृत्वात भाऊबिजेचा उपक्रम राबविला या कार्यक्रमाची सांगता विवेक नगर येथे नुकतीच झाली. चंद्रपूर च्या हजारों भगिनीसाठी एक आमदार तब्बल १४दिवसांचा वेळ देत असुन ही आम्हांसाठी अभिमानाची बाब आहे अशी भावनात्मक प्रतिक्रिया यंग युवती प्रमुख भाग्यश्री हांडे यांनी या प्रतिनिधी साेबत बाेलतांना काल दिली .

उपरोक्त आयाेजित कार्यक्रम शहरातील प्रामुख्याने पठाणपुरा , दादमहाल , विठ्ठलमंदिर , बालाजी वार्ड , गोपालपुरी , अन्च्लेश्वर वार्ड , भानापेठ , महाकाली वार्ड , भिवापूर , बाबूपेठ , अष्टभूजा , श्याम नगर , इंदिरानगर , संजय नगर , क्रूष्णणगर , विवेक नगर , सरकार नगर , तूकूम , शास्त्री नगर , बापट नगर , राष्ट्रवादी नगर , जट्पुरा , रामनगर , तुलसी नगर , वडगाव इत्यादि ठिकाणी पार पडले . बहीण भावाचे अतुट व पवित्र नाते जपवून ठेवणां-या या कार्यक्रमांना संस्थेचे संस्थापक तथा चंद्रपूरचे अपक्ष विद्यमान आमदार किशोर जोरगेवार , चंद्रपूर शहर प्रमुख संघटीका वंदना हातगांवकर व युवती प्रमुख भाग्यश्री हांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती हाेती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्गा वैरागडे , विमल काटकर , वैशाली रामटेके , वैशाली मेश्राम ,चंदा वैरागडे , रूपा परसराम, कौसर खान , आशा देशमुख , कल्पना शिंदे ,सविता दंडारे , प्रेमीला बावणे , अस्मिता डोनारकर , संगीता. कार्लेकर ,स्मिता वैद्य , आशु फुलझेले , वैशाली मद्दीवार आरती आगलावे , प्रगती पड्गेलवार , रुपा मेश्राम , जास्मीन शेख सुजाता.बबली , अनिता झाडे , शमा काजी आदिनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here