अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात सरपंच संघटनेचे आमरण उपोषण…

37

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात सरपंच संघटनेचे आमरण उपोषण…

गावातील नागरिकांनी पहिल्याच दिवशी केले मुंडण

रत्नाकर चटप व बाळकृष्ण काकडे यांचे आमरण उपोषण सुरू


नांदा फाटा – अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर यांच्या विरोधात दत्तक ग्राम सरपंच संघटनेच्या वतीने अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात सरपंच संघटनेचे आमरण उपोषण सुरू झाले. गेल्या तीन दिवसांपासून हे साखळी उपोषण सुरू असून आंदोलनाची योग्य दखल घेतली न गेल्याने आज पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

दत्तक गावांतील सीएसआर निधी वाटपांतर्गत तिढा सोडवण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी दहा गावातील सरपंच एकत्र येवून कंपनीविरोधात साखळी उपोषणासाठी सुरू केले. मात्र कंपनीने कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्याने आज पासून ग्राम पंचायत नांदा चे सदस्य व अखिल भारतीय सरपंच संघटना जिल्हा सचिव रत्नाकर चटप तसेच आवाळपूर येथील उपसरपंच बाळकृष्ण काकडे हे आज पासून कंपनी विरोधात आंदोलनाला बसले.

हिरापूरचे उपसरपंच व अखिल भारतीय सरपंच संघटणा तालुका अध्यक्ष अरुण काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य चंदू राऊत, दिनेश शाहू, सुरेश धोटे, नामदेव वासेकर, जब्बार शेख व इतर दहा लोकांनी पहिल्याच दिवशी मुंडन आंदोलन केले.

आज राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष उत्तम पेचे, शैलेश लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद जोगी, आम आदमी पार्टी चे जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकरे तसेच बाखर्डी येथील प्रकल्प ग्रस्त शेतकरी व ग्राम पंचायत लखमापूर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

advt