चंद्रपूर जिल्हा विकासासाठी AAP ची राज्यपालांशी महत्त्वपूर्ण भेट

0
265

चंद्रपूर जिल्हा विकासासाठी AAP ची राज्यपालांशी महत्त्वपूर्ण भेट

 

चंद्रपूर, 2 ऑक्टो. :- चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय राज्यपाल महोदयांनी आज एका महत्त्वपूर्ण दौऱ्यात भेट दिली. या भेटीदरम्यान आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील गंभीर समस्या मांडल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली.

राज्यपालांसमोर चर्चा करताना खालील महत्वपूर्ण मुद्दे मांडण्यात आले.

इरई नदी खोलीकरण व ब्लू लाईन समस्या : ब्ल्यू लाईन परिसरातील महानगरपालिकेची कार्यवाही तात्काळ थांबवणे नागरिकांना बांधकामाची परवानगी देणे आणि नदीचे खोलीकरण आणि ब्लू लाईन परिसरातील दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची मागणी करण्यात आली. या उपायांमुळे पुराचा धोका कमी होणे, नागरिकांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहणे आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होणे अपेक्षित आहे.

शिक्षण क्षेत्रात AI तंत्रज्ञान : सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्याकरिता AI तंत्रज्ञान, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, शिक्षक प्रशिक्षण आणि रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी शाळा कडे आकर्षण वाढेल आणि आधुनिक शिक्षण मिळणे, डिजिटल दरी कमी होणे आणि रोजगारक्षमता वाढणे अपेक्षित आहे.

आरोग्य व्यवस्था सुधारणा : रुग्णालयांमधील औषधांचा तुटवडा दूर करणे, सिटीस्कॅन एमआरआय मशीन सारख्या अत्याधुनिक मशनरी चा त्वरित पुरवठा करणे,कर्मचारी कमतरता निवारण आणि प्रत्येक तालुक्यात सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली. यामुळे सर्वांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणे, आरोग्य निर्देशांक सुधारणे आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवा मजबूत होणे अपेक्षित आहे.

चंद्रपूर शहर बायपास : बायपास रस्त्याच्या बांधकामाला तात्काळ मंजुरी व निधीची मागणी करण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणे, अपघातांचे प्रमाण घटणे अपेक्षित आहे.

पर्यावरण संरक्षण : सूरजागड खदान व घुगुस येथील लॉयड्स मेटल प्रस्तावित प्रकल्पांना विरोध दर्शवण्यात आला. यामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि स्थानिक पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य संतुलन राखले जाणे अपेक्षित आहे.

स्थानिक उद्योग विकास : स्थानिक उद्योगांसाठी विशेष आर्थिक पॅकेज, कर सवलती आणि नवीन विशेष औद्योगिक क्षेत्र विकसनाची मागणी करण्यात आली. यामुळे रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्था बळकटीकरण आणि युवकांना स्थानिक पातळीवर संधी मिळणे अपेक्षित आहे.

कोळसा क्षेत्रातील भ्रष्टाचार निर्मूलन : WCL, कोल वॉशरी, रेल्वे साईडिंग आणि CSTPS मधील कथित चूरी मिक्स कोळसा घोटाळ्याची CBI चौकशीची मागणी करण्यात आली. यामुळे पारदर्शकता वाढणे, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण होणे आणि विज दर कमी होतील.

राज्यपाल महोदयांनी या सर्व समस्यांचे गांभीर्य ओळखून त्यांच्या निराकरणासाठी जिल्हाधिकारी यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मयूर राईकवार यांनी सांगितले, “चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपाययोजनांमुळे जिल्ह्याचा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकास होणे अपेक्षित आहे. आम्ही या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवून असू आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.”

या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते सुनिल मूसले, जिल्हा सचिव राजकुमार नगराले आणि जिल्हा सचिव प्रशांत सिदुरकर देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here