वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

0
106

वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा

प्रत्येकाची वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना वेगवेगळी असते. राजुरा तालुक्यातील अमन करमनकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केलं व परिसरामध्ये वृक्षारोपण करून आपला वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला.

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुठलाही बडेजाव न करता समाजातील बरेचसे लोक काही आगळेवेगळे उपक्रम राबवत असतात. यामध्ये कुणी अन्नदान करतो तर कुणी गोरगरिबांना फळांचे वाटप करतात कुणी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून बक्षीस वितरण करतात तर कोणी वंचित दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासतात. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रम राबवितात गरजुंना मदतीचा हात मिळावा हा उद्देश यामागे असतो. हाच उद्देश मनाशी धरून अमन करमनकर यांनी जि.प.शाळा बामणवाडा व छत्रपती शिवाजी महाराज आश्रम शाळा बामणवाडा येथील विद्यार्थ्यांना पेन, वही,खाऊ अशा प्रकारच्या शैक्षणिक साहित्य वाटप केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणं फार महत्त्व गरजेचा आहे कारण पर्यावरणाचा समतोल बिघडला तर खूप कठीण परिस्थिती भविष्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी निदान एक तरी झाड लावून त्यांचे संगोपन केलं पाहिजे. अमन करमनकर यांनी वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपणही केलं गोर गरिबाच्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन देऊन यशाच शिखर कस गाठता येईल हे देशील मुलांना सांगितले. अशाप्रकारे शालेय साहित्य व वृक्षारोपण करून अमन करमनकर असल्याने आपला वाढदिवस साजरा केला. त्यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here