घुग्घुस येथील बौध्द स्मशानभुमी ते प्रियदर्शिनी कन्या विद्यालय शाळेपर्यंतच्या रस्त्यावरील धूळ साफ करा – आप ची मागणी

0
99

घुग्घुस येथील बौध्द स्मशानभुमी ते प्रियदर्शिनी कन्या विद्यालय शाळेपर्यंतच्या रस्त्यावरील धूळ साफ करा – आप ची मागणी

 

घुग्घुस शहरात व परिसरात अनेक प्रकारच्या कंपन्या आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रदूषित शहर म्हणून घुग्घुस ओळखला जातो. विविध कंपन्यामुळे गावामध्ये प्रदूषण भरमसाठ होत आहे. यामुळे बऱ्याच लोकांना श्र्वसनाचा आजार सुद्धा झाला आहे. या कंपन्याच्या जड वाहतुकीमुळे बौद्ध स्मशानभूमी ते प्रियदर्शनी कन्या महाविद्यालय घुग्घुस शाळा पर्यंतच्या रोडवर सुद्धा धुळाचा खूप मोठा जाड थर बसलेला असतो.
घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुद्धा रोजच या मार्गाने येणं जाणं करतात परंतु या विषयाकडे कधीच लक्ष देत नाही का..? असं दिसून येत आहे.
नगर परिषदेने कुंभकर्णाच्या झोपेतून बाहेर येऊन सामान्य जनतेच्या हितासाठी काम करावे अशी विनंती आम आदमी पार्टीचे अध्यक्ष इंजी. अमित बोरकर यांनी केली आहे. हा मार्ग गावामध्ये येण्या-जाण्याकरिता एकमेव मार्ग आहे. दररोज शाळेचे मुलं, कामावर जाणारे कामगार, नागरिक किंवा कुणालाही कुठे जायचे असेल तर या मार्गाचा वापर करावा लागतो. म्हणून या मार्गावरील धूळ जर येत्या काही दिवसात साफ करून रोडवर टॅंकरने पाणी मारायचे काम सुरू झाले नाही तर येणाऱ्या तीन दिवसानंतर आम आदमी पक्षातर्फे घुग्घुस पोलीस स्टेशन सामोरील चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळेस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे, युवा अध्यक्ष सचिन सिरसागर, सचिव संदीप पथाडे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here